Independence Day : परदेशातही स्वातंत्र्यदिनाची क्रेझ; ब्रिटीशांच्या राजधानीत भारतीयांनी फडकावला तिरंगा | पुढारी

Independence Day : परदेशातही स्वातंत्र्यदिनाची क्रेझ; ब्रिटीशांच्या राजधानीत भारतीयांनी फडकावला तिरंगा

यवत(पुणे); पुढारी वृत्तसेवा : देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचा उत्साह असताना परदेशात देखील स्वतंत्र दिनाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ज्या ब्रिटिश राजवटीतुन आपला देश स्वतंत्र झाला, त्या ब्रिटिश राजधानीत म्हणजेच लंडन मधील रेल्वे स्टेशन परिसरात अनिवासी भारतीयांनी तिरंगा ध्वज फडकवत स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ठिकाणी असणाऱ्या जवळपास 20 हुन अनिवासी भारतीय मध्ये सगळे महाराष्ट्रातील नागरिक आहेत हे विशेष.

यावेळी प्रतिक्रिया देताना लंडनस्थित असलेले डॉ. संदीप शिवाजी देशमुख यांनी सांगितले की, व्यावसायिक कामानिमित्त आम्ही जरी परदेशात असलो तरी देशाबद्दल अभिमान कायम आहे. 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्व जण रेल्वे स्टेशन परिसरात जमा होऊन स्वतंत्र दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष केला. यावेळी आम्ही सातासमुद्रापार असलो तरी आपल्या देशाची आठवण मात्र कायम येते असे सांगितले.

हेही वाचा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका करणार दिव्यांगांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

शिर्डी मतदारसंघात काँग्रेस लढणार : चंद्रकांत हंडोरे

नगर : नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा सुरू करणार : आ. आशुतोष काळे

Back to top button