सातारा : वेण्णालेक परिसरात हिमकण; ऐन उन्हाळी हंगामात हिमकणांचा नजराणा | पुढारी

सातारा : वेण्णालेक परिसरात हिमकण; ऐन उन्हाळी हंगामात हिमकणांचा नजराणा

महाबळेश्वर पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर,थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.  थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. शहरासह तालुक्यात थंडी सोबतच गार वारे वाहत आहे. स्थानिकांसह पर्यटक एन उन्हाळी हंगामात महाबळेश्वरमध्ये ”काश्मीर” चाच जणू अनुभव घेत आहेत.

या बदललेल्या वातावरणाने सोमवारी (दि.२७) पहाटे वेण्णालेक सह लगतच्या परिसरात दवबिंदू हिमकणात रूपांतरण झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह वेण्णालेक परिसरातील वाहनांच्या टपांवर देखील मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळाले. शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. वेण्णालेक सह परिसरातील रेस्टॉरंट हॉटेल्सबाहेर सायंकाळी थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार अनेकजण घेत असल्याचे पाहावयास मिळत आहेत. महाबळेश्वरच्या या कडाक्याच्या थंडीमुळे मुख्य बाजारपेठेत सायंकाळी येथील मुख्य बाजारामध्ये फिरताना पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना दिसून येत आहेत. शहरातील तापमानामध्ये सतत चढ उतार होत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button