satara murder : सातारा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून - पुढारी

satara murder : सातारा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून

चाफळ ; पुढारी वृत्तसेवा : एकतर्फी प्रेमातून युवकाने युवतीवर चाकूहल्ला करून तिचा निर्घृण खून केला (satara murder). गुरुवार (दि. २३) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चाफळ (ता. पाटण) येथे ही घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाहुरवाडी येथे कार्यरत असलेली शिक्षिका आपल्या दोन मुलींसह चाफळ येथे वास्तव्यास आहे. त्यांचे मूळ गाव वाठार असून या तिघी मायलेकी चाफळ येथे राहत आहेत.

गुरुवारी सकाळी आपल्या लहान मुलीला बरोबर घेऊन शिक्षिका शाळेत गेल्यानंतर संशयित युवकाने चाफळ येथे येऊन युवतीवर चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केला (satara murder).

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतले असून घटनास्थळी भेट दिली. मल्हारपेठ पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्याची व संशयित युवकाचे जाबजबाब घेण्याची कार्यवाही दुपारपर्यंत सुरू होते.

Back to top button