मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जे पक्ष सोडून गेलेत त्यांना 'जय महाराष्ट्र', त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. आता या गद्दारांना गाडायचे आहे. असे कार्यकर्त्यांना आवाहन करतानाच एकदाच काही त्या निवडणूका होऊन जाऊ दे… एकेक फोडण्यापेक्षा निवडणुका घेऊन दाखवा…मग पाहतो…असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले. (Uddhav Thackeray)
सायन कोळीवाडा येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शुक्रवारी (दि.२८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर सायन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.२९) मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (Uddhav Thackeray)
भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कुणीतरी पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येते, मग ते उधाण रागाचे, त्वेषाचे, जिद्दीचे आहे… आपली जिंकण्याची ईर्ष्याही आणखी वाढत आहे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांचे कौतुक करत जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. ज्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ द्या. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावे लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.
हेही वाचा;