पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना सन्मान मिळवून दिला. अन्याय दूर करत त्यांनी लोकांना गुलामिरीतून बाहेर काढले. जगभरातील अन्य राज्यांनी आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी लढाई केल्या; पण छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना गुलामगिरीतुन बाहेर काढण्यासाठी लढाई केल्या. आधुनिक भारत ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडली.छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भगतसिंह, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस या सर्वांच स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज होते."