नाशिक : मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ईशान्येश्वराचे दर्शन | पुढारी

नाशिक : मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ईशान्येश्वराचे दर्शन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानच्या श्री क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिरास सदिच्छा भेट दिली. तसेच ईशान्येश्वराचे दर्शन घेतले. संस्थानच्या पदाधिकार्‍यांनी शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, श्री शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅप्टन अशोककुमार खरात, उपाध्यक्ष राजेंद्र घुमरे, सरचिटणीस नामकर्ण आवारे, विश्वस्त नितीन गांगुर्डे, डॉ. निरंजन निर्मळ, अरविंद बावके, रमेश हिंगे, दीपक लोंढे आदींसह भाविक उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button