अफजलखान कबरीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; आज होणार सुनावणी | पुढारी

अफजलखान कबरीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; आज होणार सुनावणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सातारा जिल्ह्यातील प्रतापगड परिसरातील अफजल खानच्या कबरीजवळील बेकायदेशीर बांधकाम हटविण्याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आज शुक्रवारी (दि.११) यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  अॅड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरूवारी याचिका दाखल केली आहे.  या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
प्रतापगडावरील अफजल खानच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण काल बुधवारी (दि.09) तब्बल १५०० पोलिसांच्या बंदोबस्तात हटवण्यात आले आहे . शिंदे – फडणवीस सरकारने केलेल्या या सर्जिकल स्ट्राइकने परिसरात खळबळ उडाली.  परिसरात १४४ कलम जारी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराक्रम म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा काढल्याचा इतिहास आहे. आजही त्याची साक्ष म्हणून अफजल खानाची कबर आहे. मात्र, गेल्या काही वर्षात त्या परिसरात इतर काही गोष्‍टींचे अतिक्रमण वाढले होते. यातून अनेकदा वाद – प्रतिवाद सुरू होता. कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याचे विषय ऐरणीवर आले होते. याच कारणामुळे सातारा पोलिसांनी इतर चार जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त ठेवला. रात्री उशिरापासूनच हा बंदोबस्त आल्यानंतर पहाटे चोख बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील प्रतापगड परिसरातील अफजल खानच्या कबरीजवळील बेकायदेशीर बांधकाम हटविण्याच्या वादावर आज (दि.११) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. अफझल खान स्मारक समितीच्या वतीने अॅड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरूवारी याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत म्हंटल आहे की, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडत असताना स्मारकला कोणताही धक्का लागणार याची काळजी घ्यावी. असा आदेश द्यावा अशी मागणी याचिकेत केली होती. पण खंडपीठाने गुरूवारी (दि.१०) यावर कोणताही आदेश आत्ता देण्याऐवजी सविस्तर शुक्रवारी सुनावणी करू असे म्हटले होते.
हेही वाचा 

Back to top button