Satara Earthquake : साताऱ्यातील कोयना धरण परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के | पुढारी

Satara Earthquake : साताऱ्यातील कोयना धरण परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के

पाटण : पुढारी वृत्तसेवा; कोयना धरण परिसरात शुक्रवारी दुपारी एक वाजता ३ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवल्याची माहिती कोयना भूकंप मापन केंद्रावरून देण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावच्या नैऋत्येस ७ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली ९ किलोमीटर अंतरावर होती.

कोयना धरणापासून भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर १२ किलोमीटर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या भूकंपात कोयना धरणासह स्थानिक पातळीवर कोणतीही हानी झाली नसल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा भूकंप कोयना, पाटण, पोफळी, अलोरे या पाटण व चिपळूण तालुक्यासह सातारा, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यातील काही विभागात जाणवला.

Back to top button