सातारा : प्रतापगड- कुंभरोशी रस्ता दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद (Video) | पुढारी

सातारा : प्रतापगड- कुंभरोशी रस्ता दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद (Video)

प्रतापगड : पुढारी वृत्तसेवा : काल मध्यरात्री कुंभरोशी प्रतापगड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. स्थानिकांनी तत्काळ बांधकाम विभागाचे उपअभियंता गोंजारी यांच्याशी संपर्क साधला. बांधकाम विभागने तात्काळ जेसीबी पाठवल्यामुळे दरड हटवण्याचे काम सुरू झाले आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील सर्व घडामोडींवर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी लक्ष ठेवले आहे. त्या तात्काळ मदतीसाठी संबंधितांना सुचना करत आहेत.

Back to top button