पिंपरी : पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतेत | पुढारी

पिंपरी : पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतेत

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा: मान्सूनच्या पावसाने ताण दिल्याने खरीप भात उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. शेतकरीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. या वर्षी मान्सूनचा पाऊस सर्वत्र पुरेसा पडणार असून समाधानकारक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने मे महिन्यातच जाहीर केला होता.

दर वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मावळ तालुक्यातील विविध भागात दाखल होणारा पाऊस या वर्षी जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी अद्याप तालुक्यात दाखल झालेला नसल्याने मावळातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. मान्सून वेळेवरती येईल या आशेवर मावळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी भात रोपांची पेरणी धूळ वाफेवर तर काहींनी आपल्याकडे असलेल्या पाण्यावर केली होती.सध्या पावसाने तान दिला असल्याने शेतकरी काळजीत पडला आहे.

मावळ तालुक्यात 15 हजार हेक्टर लागवडीखाली क्षेत्रापैकी 13 हजार 500 हेक्टर खाली भात लागवड घेतली जात असून मान्सूनचा पावसात भात पीक चांगले येते.मान्सूनच्या पावसाने ताण दिल्याने भात पिकाची पेरणी बरोबर खरीप भात पिकाबरोबरच खरीप कडधान्ये भुईमूग,सोयाबीन आधी पिकांच्या पेरण्याही लांबल्या आहेत. तर शेतकर्‍यांनी शंभर ते दीडशे मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय भात व इतर खरीप पेरणी करू नये असे आव्हान मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.

Back to top button