सातारा : आम्ही बांगड्या भरल्या नाहीत ; खा. उदयनराजेंचा खा. संजय राऊत यांना इशारा | पुढारी

सातारा : आम्ही बांगड्या भरल्या नाहीत ; खा. उदयनराजेंचा खा. संजय राऊत यांना इशारा

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा
संजय राऊत कोण मला माहीत नाही. आम्ही कोणाबद्दल वाईट बोलत नाही. आमच्याबद्दल कोण जर वाईट बोलले तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला. जलमंदिर पॅलेस येथे पत्रकारांनी उदयनराजे यांना राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व संजय राऊत यांनी केलेल्या टिप्पणीबाबत विचारले असता, उदयनराजे यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने निशाणा साधला.

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेने नाकारल्यानंतर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्या टिकेनंतर संजय राऊत यांनी घराण्याचा उल्‍लेख करून कोणी किती पक्ष बदलले याविषयी बोलायला लावू नका, असे आव्हान दिले होते. याबाबत उदयनराजे यांना प्रतिक्रिया विचारली असता कॉलर उडवत खा. उदयनराजे म्हणाले, संजय राऊत कोण मला माहीत नाही.

आम्ही कोणाच्या बद्दल वाईट बोलत नाही. आमच्याबद्दल कोण जर वाईट बोलले तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. छोटे असू दे वा मोठं असू दे, प्रत्येकाला रिस्पेक्ट व आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. आम्ही गप्प बसणार आहे का? बाकी काय पेटलं तरी चालेल मग बघतोच, असा इशाराच खा. राऊत यांना उदयनराजे यांनी दिला आहे.

हेही वाचा :

 

Back to top button