पुणे-सातारा रस्त्यावर ‘द बर्निंग कार’ | पुढारी

पुणे-सातारा रस्त्यावर ‘द बर्निंग कार’

खेड शिवापूर, पुढारी वृत्तसेवा: पुणे-सातारा रस्त्यावरील गोगलवाडी फाटा येथे एका कारने पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने गाडीतून बाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुणे-सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी (ता. भोर) हद्दीतील गोगलवाडी फाट्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला. यामध्ये बसलेले संदीप उत्तम गवारे (वय 36, रा. प्रथम हाऊसिंग सोसायटी, कावेरीनगर, वाकड, पुणे), अजय गुळमिरे (वय 21, रा. अशोधाम अपार्टमेंट, जैन शाळेजवळ, चिंचवड) आणि प्रवीण बारणे (वय 30, रा. दगडू पाटीलनगर, थेरगाव) या तिघांनी गाडीबाहेर धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याच वेळी राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील व पोलिस हवालदार अजित माने यांनी तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली.

Back to top button