पाटण : खाद्याच्या शोधात बिबट्या घुसला घरात | पुढारी

पाटण : खाद्याच्या शोधात बिबट्या घुसला घरात

पुढारी वृत्तसेवा : उंडाळे (ता.पाटण)
पाटण तालुक्यातील मारुल हवेली विभागात बिबट्याचा वावर वाढला असून शनिवार दि.12 रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खाद्याचा पाठलाग करताना बिबट्या घरात घुसला. बिबट्या आता प्रत्यक्षात घरात येत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

शनिवारी संध्याकाळच्या सुमारास बिबट्या मांजराचा पाठलाग करत असताना मारूल हवेली येथे दिवशी रस्त्यावरील एका घरात घुसला. घरात बसलेल्या नागरिकांना समोर बिबट्या पाहून पाचावर धारण झाली. घरच्यांनी आराडाओरड करून बिबट्याला हुसकावून लावले. दरम्यान, बिबट्या घरात घुसल्याची माहिती कळताच परिसरात खळबळ उडाली.

मारूल हवेली विभागात बिबट्याचा उपद्रव सुरूच असून कोंबडी, शेळी, रेडकू अशा पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरूच आहेत. खाद्याच्या शोधात फिरताना अनेक ठिकाणी बिबट्याचे वारंवार दर्शन होत असते. भरदिवसा शेती शिवारात बिबट्या निदर्शनास पडत असल्याने शेतात जाणा-या शेतकरीवर्गा समोर प्रश्नचिन्ह उभा आहे. बिबट्याचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button