परभणी : मंगरुळ येथे स्वाभिमानाचा रास्ता रोको | पुढारी

परभणी : मंगरुळ येथे स्वाभिमानाचा रास्ता रोको

मानवत; पुढारी वृत्तसेवा: शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ४ ) रोजी तालुक्यातील मंगरुळ पाटीवर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १० तास वीज मिळावी आणि थकीत वीज बिलापोटी वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी यासह अनेक मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मानवत तालुक्यातील मंगरुळ  येथे रास्ता रोको करण्यात आला.

घटनास्थळी विजवितरणचे उपअभियंता एन. व्ही. उईके, ग्रामीण अभियंता आर. जी. बिराजदार, एस. यु. गिरी यांनी भेट देऊन यावेळी निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर, आदिनाथ डुकरे, महेश कदम, लक्ष्मण काळे, तुलसीदास काळे, तुकाराम धोत्रे, अनंता आमटे, विठ्ठल चोखट, बाळू डुकरे आदीजण सहभागी झाले होते. याच दरम्यान रास्ता रोकोमुळे दोन तास वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button