सातारा : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आपण काही स्टंट बघितले. ते स्टंट म्हणजे वार्यावरची वरात होती. मोटारसायकल वार्यावरून जाते आणि खाली उतरते. खाली उतरायचा विषय नाही. त्यांचं कामच सगळं वार्यावरचं आहे. जमिनीला धरून काही नसतंय, त्यांचे जे काही आहे ते 'वरून'च चालू असतंय. त्यांच्या कामाप्रमाणेच हवेतून मोटारसायकल आली अन् खाली उतरली, अशी खोचक टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर केली.
सातार्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी खा. उदयनराजेंना तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? जसे उदयनराजे तुम्हाला आय लव्ह यू म्हणतात तुम्ही तसे म्हणाला का? या पत्रकारांच्या प्रश्नावर आ. शिवेेंद्रराजे म्हणाले, त्यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. माझा त्यांना डायरेक्ट फोन लागत नाही. सुनील काटकरांना माझा फोन लागला. मी त्यांच्याजवळ शुभेच्छा दिल्या. मी सुनील काटकरांना कसे काय आय लव्ह यू बोलणार? असा उलटप्रश्नच शिवेंद्रराजेंनी केला.
त्यांनी हवेतून एन्ट्री केली ती त्यांच्या कामाप्रमाणे बरोबर आहे. कारण त्यांचे सगळे विषय हवेतूनच असतात. जमिनीवर काहीच नसते. सत्तारूढ आघाडीतले नगरसेवक एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. नगरपालिकेत भ्रष्टाचार सुरु असून तो सातारकर जनता पाहत असल्याचे आ. शिवेंद्रराजे म्हणाले. आम्ही पाच वर्षे विकास करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यासारखे नुसता शेवटच्या सहा महिन्यात काम दाखवयाचे असे काही आमच्याकडून होणार नाही.
काही दिवसांपूर्वी आपण काही स्टंट बघितले. आपण वार्यावरची उडी पाहिली. मोटारसायकल वार्यावरून जाते आणि खाली उतरते. खाली उतरायचा विषय नाही. त्यांचे सगळं कामच वार्यावरचं आहे. जमिनीला धरून काही नसतंय, त्यांचे जे काही आहे ते 'वरून'च चालू असतंय. त्यांच्या कामाप्रमाणे हवेतून मोटारसायकल आली अन खाली उतरली. काही हरकत नाही. आपल्याला तर तसे हवेतले जमणार नाही. आपण स्वतःच्या पैशाने गाडी घेतली आहे, ती रस्त्याने चालत आहे, असा टोलाही आ. शिवेंद्रराजेंनी लगावला.
हेही वाचलंत का?