सातारा : कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत : ना. यशोमती ठाकूर | पुढारी

सातारा : कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत : ना. यशोमती ठाकूर

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील काँग्रेस भक्‍कम करण्यासाठी लागेल ते सहकार्य करू, असे आश्‍वासन महिला आणि बाल कल्याण मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी दिले.
सातारा जिल्हा काँग्रेस भवनाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, प्रदेशचिटणीस राजेंद्र शेलार, रजनी पवार, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अ‍ॅड. दत्तात्रय धनावडे, धनश्री महाडीक, बाबासाहेब कदम, सुषमा राजेमहाडीक, रजिया शेख, डॉ. पल्लवी साठे, अरबाज शेख आदी उपस्थित होते.

  • सांगली : बार व्यवस्थापकाला मारहाण करून तोडफोड
    यावेळी ना. ठाकूर म्हणाल्या, सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि धोरण जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी काम केले पाहिजे. काँग्रेस पक्षाने ज्यांना आमदार व विविध पदे देऊन मोठं केले ती आपल्या पडत्या काळात सोडून गेलेत, अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवा. उद्याचे दिवस काँग्रेसचे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे. मंत्री म्हणून समाजिक कामाला जी मदत करण्याची ग्वाही ना. ठाकूर यांनी दिली.

हेही वाचलत का ? 

Back to top button