

सातारा : पुढारी वृत्तसेवा
काही वर्षांपूर्वी गर्भलिंग निदान आणि वंशाला दिवा हवा, अशा मानसिकतेतून मुलींची गर्भातच हत्या केली जायची. पण, अलिकडे हे चित्र बदलले आहे. कायद्याने गर्भलिंग निदानावर बंदी असून लोकांचीही मानसिकता बदलली आहे. परिणामी समाजात मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. सातारा जिल्ह्यात हे प्रमाण दर हजार मुलांमागे 921 मुलीं इतके झाले आहे.
कायद्याने गर्भलिंग निदानावर बंदी आणली आहे. एखाद्याने गर्भलिंग निदान केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात आहे. या कायद्याची जरब आणि मुलींची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती यामुळे आता लोकांचीही वंशाला दिवा हवा ही मानसिकता बदलत चालली आहे. त्यामुळे मुलींना गर्भातच मारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्व गोष्टींमुळे मुलींच्या जन्मदराबाबत येथे चांगली स्थिती निर्माण झाली आहे. तरीही काहीजण आजही चोरी-छुपे गर्भलिंग निदान करतात, ही मात्र वस्तुस्थिती आहे.
हेही वाचलत का ?