श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना उद्या, टीम इंडियाचा कसून सराव | पुढारी

श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना उद्या, टीम इंडियाचा कसून सराव

लखनौ : वृत्तसंस्था

श्रीलंकेविरुद्ध 24 फेब्रुवारी रोजी लखनौमध्ये होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्यासाठी रोहित ब्रिगेडने मंगळवारी कसून सराव केला. दरम्यान, श्रीलंकन संघही येथे दाखल झाला आहे.

भारतीय खेळाडूंनी दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत इकाना स्टेडियममध्ये नेटमध्ये सराव केला. तर, श्रीलंकन संघ सायंकाळी पाचनंतर सरावासाठी बाहेर पडला. दुपारच्या उन्हात भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसले. कर्णधार रोहित व इशान किशन यांनी सर्वाधिक वेळ नेट सराव केला. हिटमॅनने बूमराह व चहलच्या गोलंदाजीवर सराव केला. सरावादरम्यान इशान किशन व रोहित शर्मा यांनी सर्वाधिक षटकार खेचले. या दोहोंनी सुमारे एक तासभर सराव करताना 20 हून अधिक वेळा चेंडू सीमारेषेबाहेर मारला. मात्र, या दोन्ही फलंदाजांना बूमराहचे यॉर्कर खेळताना समस्या येत होत्या. दरम्यान, लखनौमध्ये होणारा पहिला टी-20 सामना प्रेक्षकाविना खेळविला जाणार असला तरी धर्मशाला येथील दुसरा व तिसरा टी-20 सामना (अनुक्रमे 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी) 50 टक्के प्रेक्षकांना मैदानावर येऊन पाहण्याची संधी मिळणार आहे.

Back to top button