औंधच्या वृध्दाचे मरणोत्तर नेत्रदान | पुढारी

औंधच्या वृध्दाचे मरणोत्तर नेत्रदान

सातारा : पुढारी वृत्तसेवा
औंध, ता. खटाव येथील सदाशिव यशवंत यादव यांनी मरणोत्तर नेत्रदान करुन आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, त्यांच्यामुळे एका रुग्णाला नवीन आयुष्य पाहण्याची संधी मिळणार असल्यामुळे यादव कुटुंबियांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, सदाशिव यशवंत यादव (वय 75, रा. औंध, ता. खटाव) हे औंध येथे शेती व्यवसाय करत होते. काही दिवसांपूर्वी ते आजारी पडले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. याच दरम्यान जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये एका रुग्णाला दोन्ही निकोप डोळ्यांची आवश्यकता होती. याबाबतची माहिती देऊन वैद्यकीय पथकाने यादव कुटुंबियांना सदाशिव यादव यांचे मरणोत्तर नेत्रदान करावे, अशी विनंती केली. यादव कुटुंबियांनी त्याला तात्काळ होकार दिल्यानंतर सदाशिव यादव यांचे नेत्रदान झाले.

यादव कुटुंबियांच्या निर्णयामुळे संबंधित रुग्णाला एक नवीन आयुष्य पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, मरणोत्तर नेत्रदान करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. औंध येथील यादव कुटुंबियांनी घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button