सातारा : महाविद्यालयांनी १००% लसीकरण पूर्ण करावे : मंत्री उदय सामंत | पुढारी

सातारा : महाविद्यालयांनी १००% लसीकरण पूर्ण करावे : मंत्री उदय सामंत

कराड : पुढारी वृत्तसेवा: राज्यातील महाविद्यालये  एक फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्याच विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे १००% लसीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या परिषदेत मंत्री उदय सामंत म्हणाले की, अजूनही राज्यात काही महाविद्यालयात लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे लसीकरण कॉलेजमध्ये विशेष लसीकरण मोहिम राबवून शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. १५ फेब्रुवारीनंतर त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयीन कामकाज व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (दि. ३१) रोजी येथील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये ही परिषद पार पडली. यावेळी त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज व पॉलिटेक्निकल कॉलेज या तिन्ही कॉलेजचा एकत्रित आढावा घेतला. यावेळी विविध निर्णय झाल्याची माहितीही त्यांनी दिली.तसेच या कॉलेजमधील कर्मचारी आणि सफाई कामगारांना किमान वेतन वाढीनुसार एक एप्रिलपासून वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे या सफाई कामगारांना किमान चार हजार रुपयांची पगारवाढ होणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button