दिघीकरांना लवकरच पाण्यासाठी सुखाचे दिवस | पुढारी

दिघीकरांना लवकरच पाण्यासाठी सुखाचे दिवस

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या दिघीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. भोसरी पंपिंग स्टेशनपासून दिघीतील पाणी टाकीपर्यंत पाणी नेण्यासाठी जास्त क्षमतेची पाण्याची लोखंडी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.

यामुळे पाणी टाकी भरण्याचा वेळ कमी होणार असून, अवघ्या दोन ते अडीच तासांत पाणी टाकी पूर्ण भरतील. त्यामुळे दिघीतील विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरुपी निकाली निघणार आहे.

‘या’ अर्थमंत्र्यांनी 800 शब्दात संपवलं होतं अर्थसंकल्पीय भाषण!

महापालिकेत दिघीचा 1997 साली समावेश झाला, तेव्हापासून दिघी पाण्यासह विविध मूलभूत सुविधांपासून वंचित होते. चोवीस बाय सात अंतर्गत संपूर्ण दिघी प्रभागात पाण्याची लाईन टाकली. डोंगरपाथ्याजवळ 20 दक्षलक्ष लीटर पाणी टाकीचे काम पूर्ण केले.

या पाणी टाकीशेजारीच 15 दक्षलक्ष लीटर क्षमतेच्या पंपहाऊसचेही काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. भोसरी पंपिंग स्टेशनपासून दिघीकडे येणारी पाण्याची पाइपलाइन 400 मिलिमीटर व्यासाची होती.

औरंगाबाद : “किराणा दुकानात वाईन ठेवली, तर एमआयएम दुकानं फोडणार”

त्यामुळे दिघीतील तीन पाणी टाक्या भरण्यास विलंब होत असे. एक टाकी भरण्यास साधारणत: पाच तास लागत होते. परिणामी, सुरळीत पाणीपुरवठ्यास अडचणी येत होत्या.

त्यावर मार्ग काढण्यासाठी 600 मिलिमीटर व्यासाची लोखंडी पाइपलाइन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतच्या सव्वासहा कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने मान्यता दिली असून कार्यारंभ आदेशही दिला आहे. लवकरच त्याचे काम सुरू होईल, असे सांगण्यात
येत आहे.

चंद्रपूर : हत्तीच्या स्थानांतरास वन संरक्षकांचा विरोध

या लाइनद्वारे भोसरी पंपिंग स्टेशनपासून दिघीतील टाकीपर्यंत पाणी नेण्यात येण्यात येणार असल्यामुळे अवघ्या दोन ते अडीच तासात पाणी टाक्या पूर्ण भरणार आहेत. त्यामुळे दिघीकरांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

Back to top button