कोरोनामुळे ‘सारंगी’चा सूर झाला बेसूर | पुढारी

कोरोनामुळे ‘सारंगी’चा सूर झाला बेसूर

विक्रीत मोठी घट

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षापासून कोरोनामुळे अनेक छोटे व्यावसायिक, उद्योजक, कारागीर यांच्या उपजिविकेवर परिणाम झाला आहे.

पुन्हा घडी व्यवस्थित बसत असतानाच ओमाक्रॉनच्या नवीन संक्रमणामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधामुळे हातावरचे पोट असणारे छोटे कारागीर, फेरीवाले यांच्या वस्तूविक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे.

‘या’ अर्थमंत्र्यांनी 800 शब्दात संपवलं होतं अर्थसंकल्पीय भाषण!

सारंगी वाद्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हरियाणातून पिंपरी-चिंचवड शहरात सारंगी वाद्य बनवून विकणारी कारागीर मंडळी आहेत.

बाराही महिने होणारा धंदा सध्या कोरोनामुळे होत नसल्याचे ही कारागीर मंडळी सांगतात. कोरोनामुळे शाळा, गावजत्रा, लग्न समारंभ इतर उत्सवावर निर्बंध आल्याने अशा वाद्यांच्या विक्रीत घट झाली आहे.

औरंगाबाद : “किराणा दुकानात वाईन ठेवली, तर एमआयएम दुकानं फोडणार”

तर, सोसायट्यांमधून फिरण्यास विक्री करण्यास प्रतिबंध कायमचा असतो. तो त्यात नियमांची भर पडली असल्याने सारंगी वाद्य बनविणारे कारागीरांनी सांगितले.

दापोडी येथे गेली 18 वर्षांपासून राहणारे मूळ हरियाणा राज्यातील बिधलगाव जिल्हा सोनपत येथील होशियार सिंग हे लाकडी सारंगी वाद्य तयार करून गेली पंधरा वर्षांपासून शहर व उपनगरात विकतात.

चंद्रपूर : हत्तीच्या स्थानांतरास वन संरक्षकांचा विरोध

बांबुचे लाकूड, तार, पणती यापासून सारंगी वाद्य बनविले जाते.बच्चे कंपनी, महाविद्यालयीन विद्यार्थी याला पसंती देतात. याला लागणारे साहित्य बांबुचे लाकुड आकुर्डी येथून, मातीची पणती, अंबाडी धागा, रंगीत पेपर पुण्यातून तर या वाद्याची तार दिल्लीहून आणतात.

परंतु, कोरोनामुळे नागरिक सारंगी पहिल्यासारखे विकत घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे

पुढील ३० वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही : संजय राऊत

लहान-मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सारंगी आम्ही बनवितो. एका सारंगीला किमान पन्नास ते साठ रुपये खर्च येतो. लहान-मोठ्या सारंगी सत्तर, शंभर, दोनशे रुपयांना विक्री केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून मात्र व्यवसायावर परिणाम झाला आहे.
– होशियार सिंग,कारागीर

 

Back to top button