देशाच्या दुसऱ्या स्वातंत्रलढ्यासाठी काँग्रेस सज्ज: विश्वजीत कदम

विश्वजीत कदम
विश्वजीत कदम

जत, पुढारी वृत्तसेवा :  दीडशे वर्षाच्या इंग्रज्‍यांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्याची पहिली लढाई आपण जिंकली. परंतू स्वातंत्रदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्याला दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी सज्ज राहण्याची वेळ दुर्दैवाने भाजपने आपल्यावर आणली आहे. या दुसऱ्यास्वातंत्र्यासाठी अखंड भारतातील काँग्रेस तयार आहे. अमृत महोत्सवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप हाटावं देश बचाव यासाठी लढा उभा करावा, असे आवाहन काँग्रेसचे नेते, आमदार विश्वजीत कदम यांनी केले. जत येथील काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यभर सुरू केलेल्या आझादी गौरव यात्रेत ते बोलत होते.

जत काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आझादी गौरव यात्रा महाराणा प्रताप चौक बाजारपेठ अशोक स्तंभ, संभाजी चौक, शिवाजी चौक, राममंदिर वाचनालय चौक, नगरपालिकेपासून गांधी चौकात आली. यावेळी या यात्रेचे सभेत रूपांतर झाले.

या वेळी विश्वजीत कदम कदम म्हणाले, देशाच्या स्वातंत्रलढ्यात काँग्रेसचे योगदान आहे. गेल्या ७० वर्षांमध्‍ये देशाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसने सर्व जातीधर्मांचा, पंथाचा, भाषेचा या सर्व बाबींचा विचार केला आहे; पण गेल्या सात ते आठ वर्षात केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने देशाला कोणत्या स्तरावर नेऊन ठेवले आहे हे आपण उघड्या डोळ्याने पहात आहे शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून देशातील नागरिकांना वेठीस धरण्याचं काम सुरू आहे, असा आराेप त्‍यांनी केला.

तालुक्याच्या विकासासाठी आमदार सावंतचे मोठे योगदान लाभले आहे. या तालुक्यातील पाणी प्रश्नावर त्यांनी मोठे काम केले आहे. आज सरकार कोणाचे असो ते जतच्या विकासात कोठेही कमी पडणार नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण आणखीन मजबूत संघटन केले पाहिजे, असे आमदार कदम म्‍हणाले. तसेच, दिल्लीतील राजवटीने पैसा आणि संपत्ती जोरावर भाजपने गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. लोकांना आता काँग्रेसची भूमिका योग्य वाटत आहे. पुढील काळात भाजपला सत्तेवरून दूर केल्या शिवाय सर्व घटकांचा विकास होणार नाही. यासाठी आपण सर्वांनी मोठी लढाई उभा केली पाहिजे तालुक्याच्या विकासासाठी कायम आपण सदैव तत्परतेने कार्यरत आहे, असेही ते म्‍हणाले.  

हेही वाचा  : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news