माेठी बातमी : खाते वाटप जाहीर: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ खाते | पुढारी

माेठी बातमी : खाते वाटप जाहीर: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ खाते

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सर्वांचे खातेवाटपाकडे लक्ष लागले होते. अखेर आज खातेवाटप करण्यात आले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

१८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे :

 

राधाकृष्ण विखे-पाटील  : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास

गिरीष महाजन : ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे : बंदरे व खनिकर्म

संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे : कामगार

संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत : उद्योग

प्रा.तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण  : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार : कृषी

दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे :  सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.

Back to top button