विद्यार्थ्याचा मृत्यूमुळे विरोधक आक्रमक : मुख्यमंत्री गहलोतांच्या राजीनाम्याची मागणी | पुढारी

विद्यार्थ्याचा मृत्यूमुळे विरोधक आक्रमक : मुख्यमंत्री गहलोतांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात नऊ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विराेधक आक्रमक झाले असून, मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पिण्याच्या पाण्याच्या भांड्याला हात लावल्याच्या कारणातून तिसऱीच्‍या वर्गातील इंद्रा मेघवाल या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली हाेती. २० जुलै राेजी जालोर तालुक्‍यातील सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत हा प्रकार घडला हाेता.  इंद्रा मेघवाल याला उदयपूरला येथील रुग्‍णालयात दाखल केले हाेते. उपचारावेळी त्‍याचा मृत्‍यू झाला. जेथे सुमारे एक आठवडा त्याच्यावर उपचार झाले. त्यानंतर त्याला अहमदाबादला नेण्यात आले, परंतु त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेरीस शनिवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री गहलोतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

Back to top button