

मिरज, पुढारी वृत्तसेवा : वड्डी (ता. मिरज) येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून अंमली पदार्थाचा साठा हस्तगत केल्याचे सांगण्यात आले. कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आल्याने नेमकी माहिती मिळू शकली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, मिरजेतील एका उद्योजकाच्या वड्डी येथील फार्म हाऊसवर सांगली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने पुणे विभागीय केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने काल मध्यरात्री छापा टाकला. यावेळी अमली पदार्थांचा साठा जप्त केला. गुरुवारी (दि.२६) रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र हा साठा नेमका कोणाचा याची शहानिशा सुरु असल्याने याबाबत अद्याप कोणावर गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.
जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या साठ्याची लाखो रुपये किंमतीचा असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय पथकाने टाकलेल्या छाप्या बाबत शहारात चर्चा सुरु होती.