Breaking News : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयने केली अटक

अविनाश भोसलें
अविनाश भोसलें
Published on
Updated on

पुणे, पुढारी ऑनलाईन : पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयनं अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. ईडीनं यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. सीबीआयनं गेल्या काही दिवासांपूर्वी भोसले यांच्या घरी छापे टाकले होते. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर सीबीआय नेमकी काय कारवाई करणार येणाऱ्या काळात समोर येईल. ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली होती. डीएचएफएल प्रकरणात सीबीआयकडून त्यांचा शोध घेण्यात आला होता.

येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे घर आणि काही मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने छापे टाकून महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. याच घोटाळ्यासंदर्भात व्यावसायिक संजय छाब्रिया यांना देखील अटक करण्यात आली होती.

भोसले यांच्यासह विनोद गोएंका आणि शाहीद बालवा यांच्यावरही सीबीआयने कारवाई झाली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई झाली असून मुंबई आणि पुण्यात आठ ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत.

…असा झाला रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग अविनाश भोसलेंचा प्रवास

अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. ते कोट्यवधी रुपयांच्या ABIL चे सर्वेसर्वा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरवरून पुण्यात रोजगारच्या शोधात स्थलांतर केले होते. सुरुवातीला रिक्षा चालक म्हणून कामाला सुरुवात केली अन् त्यानंतर रिक्षा भाड्याने द्यायचा व्यवसाय सुरू केला. बांधकाम क्षेत्र आणि राज्याच्या बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून लहान मोठी कंत्राटी काम मिळवली.

१९९५ ला सेना-भाजप युतीच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची काम मिळवली. सर्वच पक्षातील राजकिय व्यक्तींशी जवळीक साधण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. पुण्यातील बाणेर भागात अलिशान असं व्हाइट हाऊस उभारलं. त्यावर स्वतःच्या मालकीची तीन हेलिकॉप्टर उभी केली. २००७ मध्ये अविनाश भोसलेच्या प्रगतीला ब्रेक लागला. कस्टम विभागाने फेमा कायद्यानुसार कारवाई केली. त्यानंतर जलसंपदा घोटाळ्याचे वादळ त्यांच्यावर घोंगाऊ लागलं आणि अविनाश भोसले यांनी मार्ग बदलला.

जलसंपदा विभागातील ठेकेदारीकमी करून बांधकाम, रस्ते आणि पूल उभारणी आणि हॉटेल व्यवसायात आपल्या कामाचा विस्तार वाढवला. २०१७ साली आयकर विभागाने भोसलेंच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले.  २०२० मध्ये ईडीने पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरू केला तेव्हापासून भोसले ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news