सांगली : प्रजासत्ताक दिन संचलनासाठी अविनाश भोसलेची निवड

सांगली : प्रजासत्ताक दिन संचलनासाठी अविनाश भोसलेची निवड

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट सिनिअर अंडर ऑफिसर अविनाश दादा भोसले, गोमेवाडी याची दिल्ली येथील कर्तव्यपथावर होणार्‍या 26 जानेवारी 2024 रोजीच्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर प्रा.विजय शिंदे यांनी दिली.

भोसले हा देशमुख महाविद्यालयातील एनसीसी विभागामध्ये तृतीय वर्षात शिकत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून त्याने आरडीसी परेडसाठी आवश्यक असणारे कोल्हापूर येथे 4 व पुणे येथे 6 असे एकूण 10 कॅम्प पूर्ण केले आहेत. कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडकॉर्टर अंतर्गत सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी हे चार जिल्हे आहेत. या चार जिल्ह्यामधून ड्रीलसाठी फक्त दोन कॅडेट्सची निवड झाली आहे. त्यामध्ये आटपाडी महाविद्यालयाचा कॅडेट अविनाश भोसले असल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात त्याने मानाचा तुरा खोवला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news