sangli hyena accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार, बस्तवडे खिंडीतील घटना - पुढारी

sangli hyena accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार, बस्तवडे खिंडीतील घटना

तासगाव : पुढारी वृत्तसेवा :  तासगाव ते भिवघाट मार्गावर बस्तवडे येथील खिंडीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरस ठार झाला
(sangli hyena accident). मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या पुर्वेकडील वायफळे, बिरणवाडी, बस्तवडे परिसरात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात तरसाचा वावर आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी लोकांना रस्त्यावर तरस दिसतात. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (sangli hyena accident)

मंगळवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरस ठार झाला असावा, असा स्थानिकांचा अंदाज आहे. या रस्त्याच्या बाजूला हा तरस रक्तबंबाळ होऊन पडला होता. अपघातामुळे या परिसरातील तरसाच्या वावरावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हेही वाचलं का?

Back to top button