Gas cylinder Prices : LPG सिलिंडर स्वस्त होण्याचे केवळ स्वप्नच; १०० रुपयांनी पुन्हा गॅस महागला | पुढारी

Gas cylinder Prices : LPG सिलिंडर स्वस्त होण्याचे केवळ स्वप्नच; १०० रुपयांनी पुन्हा गॅस महागला

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : घरगुती गॅसच्या दरातून सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आज बुधवारी पुन्हा दर वाढल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. एलपीजीच्या समीक्षा बैठकी दरम्यान गॅस सिलिंडरच्या दरात (Gas cylinder Prices) वाढ करण्याचा निर्णय झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने ही कपात होवू शकते,असे बोलले जात होते. परंतु केंद्राने पुन्हा गॅस सिलिंडरचे दर वाढवल्याने खिशाला कात्री लागणार आहे. याशिवाय पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता केंद्र सरकार पेट्रोल तसेच डिझेलप्रमाणेच गॅस सिलिंडरच्या दरातही कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

Gas cylinder Prices : घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही

१ डिसेंबरपासून गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

दिवाळीपासून एक्साईज ड्युटी आणि व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. दरम्यान, दिवाळीच्या आधी एलपीजी महागाईचा भडका उडाला होता. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत (Gas cylinder Prices) २६६ रुपयांची वाढ झाली होती.

दरम्यान, यातील दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ कमर्शियल सिलिंडरमध्ये झाली होती. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

गॅस सिलिंडर एक हजार रूपयांचा टप्पा पार करणार

घरगुती सिलिंडर दिल्लीत १४.२ किलो विना सबसिडी गॅस सिलिंडरची किंमत ८९९.५० रूपये इतकी आहे. ६ ऑक्टोबरला या दरात वाढ झाली होती. तर, एक ऑक्टोबरला केवळ १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे दर वाढवले होते. कोलकाता आणि चेन्नईमध्ये आताही १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडर ९१५.५० रूपयांना मिळत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती पाहता गॅस सिलिंडर एक हजार रूपयांचा टप्पा पार करणार अशी शक्यता व्‍यक्‍त केली जात होती.

दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर २१०० रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलिंडर २१७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलिंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

Back to top button