Lok Sabha Election 2024 : सांगली कुणाची याचं उत्तर मिळाल्यानंतर राऊतांचा हट्ट बदलला असेल : विशाल पाटील | पुढारी

Lok Sabha Election 2024 : सांगली कुणाची याचं उत्तर मिळाल्यानंतर राऊतांचा हट्ट बदलला असेल : विशाल पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : सांगली आहे कुणाची? याचं उत्तर खासदार संजय राऊत यांना येथील जनतेने दिल असेल. त्यानंतर त्यांच्या हट्टात बदल होऊन त्यांच मन परिवर्तन झालं असेल. संजय राऊत यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. सांगलीचा विषय बंद खोलीत व्हायला पाहिजे होता. पण तो बाहेर आला म्हणून विश्वजीत कदम यांनी उलट उत्तर दिले, असे सांगत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सोमवारी (दि.८) खासदार राऊत सांगलीत येऊन विरोधात बोलल्याबद्दल खंत व्यक्त केली.

उद्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल. ती आम्हालाच मिळेल असा विश्वास आहे. विश्वजीत कदम त्यासाठी प्रयत्न करत आहेत, असेही विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून सांगलीच्या जागेची चर्चा सुरू आहे. पक्षाने सांगलीची जागा काँग्रेसलाच घ्यायची असा निर्णय घेतला होता. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली माझे नाव एकमताने दिले होते. मात्र आघाडीतील जागावाटपाचा मुद्दा समोर आल्याचे ते म्हणाले.

खासदार संजय राऊत यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे. त्यांच्याकडे पाहून खूप मोठी उर्जा येते. राऊत मराठी माणसांचा आवाज आहेत. मात्र जो आवाज सांगलीकरांनी दिला तोच आवाज त्यांनी संगली करांच्या विरोधात येऊन वापरला. त्याबद्दल आमच्या मनात खंत आहे. विश्वजीत कदम मांडत असलेली भूमिका सांगलीतील जनतेची आहे. मात्र राऊत यांनी त्यांच्याविरोधात संशयास्पद बोलणे आघाडी धर्माला शोभणार नाही. शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबद्दल मनात आदर आहे.

सांगलीचा निर्णय व्हायच्या आधी राऊत यांनी सांगलीत येण्याच कारण काय? असा सवाल करत ते म्हणाले की, दोन तीन दिवस त्यांनी येथील परिस्थिती बघितली आहे. सांगलीचा विषय बंद खोलीत व्हायला पाहिजे होता; परतु तो बाहेर आला म्हणून विश्वजीत कदम यांनी त्याला उत्तर दिले आणि जागा आमच्याकडे आहे असे सांगितले. उद्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काय ते समजेल, असे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button