Pune Shadi.com crime : तरुणींना सैन्याच्या वर्दीची भुरळ घालणार्‍याला बेड्या, शादी डॉट कॉमवरुन फसवुणकीचे टाकत होता जाळे | पुढारी

Pune Shadi.com crime : तरुणींना सैन्याच्या वर्दीची भुरळ घालणार्‍याला बेड्या, शादी डॉट कॉमवरुन फसवुणकीचे टाकत होता जाळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : Pune Shadi.com crime : भारतीय सैन्य दलात भरती झाल्यानंतर २०१८ पासून कर्तव्यावर हजर न होता वर्दीच्या जोरावर तरुणींवर शादी डॉट कॉमवरुन एकजण फसवुणकीचे जाळे टाकत होता.  त्‍याला सिंहगड रोड पोलिसांनी अहमदनगर येथून बेड्या ठोकल्य. त्याने पुणे, नगर, लातूर येथे अशाच पध्दतीने तरुणींची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रशांत भाऊराव पाटील (वय ३१ रा. कुंपटगिरी ता. खानापुर जि. बेळगाव) असे अटक केलेल्या संशयित आराेपीचे नाव आहे.

शादी डॉट कॉम वेबासाईटद्वारे प्रशांतने पुण्यातील एका महिलेसोबत ओळख वाढवली. तिला लग्नाच्या आमिषाने  भेटण्यास बोलाविले.  सैन्यदलात नोकरीला असल्‍याचे सांगितले.

Pune Shadi.com crime :  भावनिक करुन महिलेवर अत्याचार

नवीन आयुष्याची सुरुवात श्री दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेवुन सुरु करु, असे सांगत त्‍याने  महिलेचा विश्वास संपादित केला. त्यानंतर ड्रेस बदलण्याच्या बहाण्याने तिला मोटारीत बसवून नवले ब्रिज जवळील लॉजवर नेले. आम्ही देशासाठी दिवसरात्र दहशतवाद्याशी लढतो, असे बोलून भावनिक करुन तिच्यावर अत्याचार केला.

पीडितेने आरडाओरडा करु नये म्हणून त्यानेतिला सैन्य दलाच्या वर्दीची शपथ घातली. त्यानंतर तिला गाडीत बसवून कर्तव्यावर जायचे आहे, असे सांगून महिलेला शनिवारवाडा परिसरात सोडून पळ काढला. काही दिवसानंतर प्रशांत फोन उचलत नसल्याने महिलेला संशय आल्यामुळे तिने सिंहगडरोड पोलीस ठाण्‍यात त्‍याच्‍याविराेधात तक्रार दिली.

पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, उज्वल मोकाशी, सचिन माळवे, शंकर कुंभार, किशोर शिंदे, अविनाश कोडे, अमेय रसाळ, सुहास मोरे यांनी अटकेची कारवाई केली.

अशी केली अटक

पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढून पथक नगरला गेले. तेथे आरोपीचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सैन्य दलात भरती झाल्यानंतर २०१८ पासुन कर्तव्यावर रुजु झाला नसल्याचे सांगितले. त्याशिवाय २०१८ पासून नोव्हेंबर २०२१ पर्यंत त्याने पुणे, नगर, लातुर याठिकाणी फसवणुकीचे ५ गुन्हे केल्याची कबुली दिली.

हेही वाचलं का?

Back to top button