Clean City : विट्यातील सफाई कर्मचारी महिलेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार | पुढारी

Clean City : विट्यातील सफाई कर्मचारी महिलेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार

विटा ; पुढारी वृत्तसेवा

विटा (Clean City) शहराचा स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक आला आहे. २० नोव्हेंबरला दिल्लीत थेट राष्ट्रपतींच्या हस्ते विटा पालिकेला पारितोषिक मिळणार आहे.  शांताबाई उत्तम हत्तीकर असे त्‍यांचे नाव आहे. या पालिकेच्या सफाई कर्मचारी महिलेसोबत आजी माजी नगराध्यक्षांसह गौरविण्यात येणार आहे.(Clean City)

स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात विटा पालिकेने नगर स्वच्छतामध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शहर स्वच्छता, शहरवासीयांची व्यक्तिगत आणि सामूहिक आरोग्य स्वच्छता, कचरा डेपो, कचरा विलगीकरण, हागणदारी मुक्त शहर, झोपडपट्टीमुक्त शहर, वराह मुक्त शहर, बाग बगीचा, मैदाने आणि रस्ते सुशोभीकरण, शौचालय युक्त, स्वच्छतागृहे युक्त शहर, गटार स्वच्छता इत्यादी सर्व निकषांवर विटा पालिका संपूर्ण देशाभरातील इतर समकक्ष शहरांमध्ये सरस ठरली आहे.

या स्वच्छता अभियानाचा पारितोषक वितरण सोहळा २० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होत आहे. या निमित्ताने स्वच्छता अभियानामध्ये नंबर मिळविलेले देशभरातील शहरातील नगरपालिका नगरपंचायतीचे पदाधिकारी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

विटा पालिकेच्यावतीने माजी नगराध्यक्ष आणि स्वच्छतेचे ब्रँड अँबेसिडर वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील आदी दिल्लीच्या सोहळ्यात सहभागी होतील; परंतु यात एक वैशिष्टपूर्ण गोष्ट आहे. ती म्हणजे जसे की वैभव पाटील यांनी बोलून दाखवले होते. या दिल्लीत होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विटा पालिकेचा एक स्वच्छता कर्मचारीही देशभरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही बरोबर नेणार आहे. देशभरात चांगला संदेश देण्याचा विटा पालिकेचा प्रयत्न असेल. शहर स्वच्छतेत योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा. त्यांच्या योगदानाचे देशात कौतुक होणार आहे.

शांताबाई उत्तम हत्तीकर या गेल्या ३४ वर्षांपासून विटा शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळात साफसफाईचे प्रामाणिकपणे काम करीत आहेत.  त्‍या विटा पालिकेच्या सफाई विभागात कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे देशातील स्वच्छ विटा शहराचा पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यासाठी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी सायंकाळी शांताबाई विमानाने दिल्लीकडे रवाना होत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button