non veg : गुजरातमध्ये अहमदाबादच्या रस्त्यांवर 'नॉनव्हेज' बंदीचा फतवा ! | पुढारी

non veg : गुजरातमध्ये अहमदाबादच्या रस्त्यांवर 'नॉनव्हेज' बंदीचा फतवा !

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन

गुजरातमध्ये, अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (AMC) ने सार्वजनिक रस्त्यांवर मांसाहारी (non veg) खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. वृत्तसंस्था एएनआयने वरिष्ठ नगर नियोजन अधिकारी देवांग दाणी यांच्या हवाल्याने सांगितले की, “सार्वजनिक रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याअंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात या वस्तूंची विक्री करता येणार नाही. अहमदाबाद महापालिकेच्या नगर नियोजन समितीने हा निर्णय घेतला आहे.

ते पुढे म्हणाले की, शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी असल्याने समितीच्या बैठकीत त्यावर बंदी घालण्याचा (non veg) निर्णय घेण्यात आला आहे.

बंदीवर प्रतिक्रिया देताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, लोकांना हवे ते खायचे स्वातंत्र्य आहे. आनंद जिल्ह्यात मुख्यमंत्री म्हणाले, शाकाहारी-मांसाहारीचा प्रश्न नाही. लोकांना वाटेल ते खायला स्वातंत्र्य आहे. मात्र स्टॉल्सवर विकले जाणारे खाद्यपदार्थ हानीकारक नसावेत आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

त्याचबरोबर AMCच्या निर्णयानंतर मंगळवारी अतिक्रमणविरोधी मोहीमही राबविण्यात आली. 40 हून अधिक हातगाड्या आणि दुकाने जप्त करण्यात आली.

याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, लोकांवर कोणतेही कायदेशीर बंधन घालण्यात आलेले नाहीत. (non veg)

देशात दोन प्रकारचे लोक आहेत, एक जे शाकाहारी आहेत आणि दुसरे मांस खातात. ते काय खातील हे निवडण्याचा त्यांचा अधिकार आहे. हे कोणीही रोखू शकत नाही.

मात्र, खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांनी स्वच्छतेची काळजी न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

हे ही वाचलं का ?

Back to top button