ग्रामपंचायत निवडणूक : खानापूर तालुका देवनगरच्या सरपंचपदी विशाल पवार विजयी | पुढारी

ग्रामपंचायत निवडणूक : खानापूर तालुका देवनगरच्या सरपंचपदी विशाल पवार विजयी

विटा : पुढारी वृत्तसेवा खानापूर तालुक्यातील देवनगर येथे सरपंच पदाच्या एकमेव जागेसाठी झालेल्या निवडणुकीत विशाल सुभाष पवार हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी सतीश रमेश पाटोळे यांच्यावर तब्बल 150 मतांनी मात केली आहे. विशाल पवार यांना 280 तर विरोधी सतीश पाटोळे यांना 130 मते पडली आहेत. या ठिकाणी नोटाला 4 मते पडली आहेत.

खानापूर तालुक्यात काल (रविवार) झालेल्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये एकूण चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिल्यांदा देवनगर त्यानंतर साळशिंगे त्यानंतर भेंडवडे राजधानी आणि नंतर गावठाण भेंडवडे अशी मतमोजणी होत आहे. मतमोजणी विटा येथील महसूल भवनाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होत आहे.
देवनगरमध्ये एकमेव सरपंच पदाच्या जागेसाठी लढत होती. येथे सरपंचपद सर्वसाधारण आहे. या ठिकाणी एकूण 414 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. एकूण 79.92% मतदान झाले आहे.

साळशिंगे येथे गौरी जाधव या सरपंच पदासाठीच्या उमेदवार होत्या. गौरी जाधव या विद्यमान आमदार अनिल बाबर गटाच्या नेत्या आणि खानापूर पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषाताई बागल यांच्या सख्ख्या बहिण आहेत. ही साळशिंगे ग्रामपंचायत गेल्यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाकडे होती. यावेळी बाबर गटाने ती आपल्याकडे खेचून घेण्याचा चंग बांधला होता. परंतु त्यांना अपयश आलेले आहे.

हेही वाचा : 

Back to top button