मुंबई : पुढारी वृत्तसेवा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबर पासून एसटी संपाची हाक दिली आहे. या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्रातील २५० आगारातील सकाळी ७ वाजेपर्यंतच्या सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. (रात्र वस्तीचे सर्व मुक्काम आपल्या नियोजित थांब्यावरुन निघाले आहेत) कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. एसटीची वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरन करण्यासह सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आणि इतर काही मागण्यासाठी आज (सोमवार) पासून एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेने कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. ऐन दिवाळीत काम बंद करुन प्रवाशांना वेठीस धरण्यात येत आहे. परंतु या काम बंद आंदोलनाकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे निदर्शनास येत आहे. सकाळपासून राज्यातील एसटीची वाहतूक सूरळीत सुरु आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबर पासून एसटी संपाची हाक दिली असली तरी, महाराष्ट्रातील २५० आगारातील सकाळी ७ वाजेपर्यंत च्चा सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. (रात्र वस्तीचे सर्व मुक्काम आपल्या नियोजित थांब्यावरुन निघाले आहेत.) कुठेही अनुसूचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे…
जनसंपर्क अधिकारी
एसटी महामंडळ
हेही वाचा :