ब्रिजभूषण यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कडक कारवाई करा : जयंत पाटील | पुढारी

ब्रिजभूषण यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कडक कारवाई करा : जयंत पाटील

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष, भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह याला तात्काळ अटक करून त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. कुस्ती आणि क्रांतिकारी लढ्याची मोठी परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहतील, असेही पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. आमदार जयंत पाटील इस्लामपूर येथील कचेरी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, भाजपचे केंद्र सरकार जनतेच्या प्रश्नावर आणि सामान्य माणसांच्या आंदोलनाबाबत असंवेदनशील आहे. त्यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र अखेर त्यांना शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे लागले. त्याचप्रमाणे महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनातही त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. सांगली जिल्ह्याने देशाला अनेक महान मल्ल दिले आहेत. या भागाने इंग्रजांच्या विरोधात क्रांतिकारी लढा दिला आहे. आम्ही सर्वजण महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहू. नव्या संसदेच्या उद्घाटन दिनी पोलिसांनी महिला कुस्तीपटूंना फरफटत नेले, त्याबद्दल त्यांचाही तीव्र निषेध करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

यावेळी पै. आप्पासो कदम म्हणाले, ब्रिजभूषण गेल्या १५ वर्षापासून फेडरेशनचा अध्यक्ष आहे. त्याने कुस्ती वाढविण्याचे नव्हे, कुस्ती संपविण्याचे काम केले. देशातील कुस्तीपटूंसह सर्व खेळाडू, प्रशिक्षक व पालकांनी महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहूया, असे आवाहन त्यांनी केले. पै. आनंदराव धुमाळ म्हणाले, या महिला कुस्तीपटूंच्या कुटुंबियांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या महिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जागतिक पदक आणून आपल्या देशाची मान उंचावली आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही.
यावेळी प्रतिक पाटील, आष्टयाचे वैभव शिंदे, महाराष्ट्र केसरी आप्पासो कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आनंदराव धुमाळ, पै. विकास पाटील, पै. अशोक मोरे, भारतश्री किरण शिंदे, कामगार केसरी प्रा. नितीन शिंदे, पै. कुंडलिक गायकवाड, पै. संग्राम जाधव यांच्यासह कुस्तीपटू व अन्य खेळाडू उपस्थित होते.

त्याचबरोबर नेताजीराव पाटील, पै. भगवान पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, विश्वनाथ डांगे, सुरेंद्र पाटील, अरुणादेवी पाटील, बी.के.पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, संजय पाटील, खंडेराव जाधव, संदीप पाटील, माणिक पाटील (बोरगाव), पोपट पाटील (सर), मानसिंग पाटील, सचिन कोळी, स्वरूप मोरे, संजयकाका पाटील, शैलेश पाटील, अविनाश खरात, संजय पाटील धनी, महादेव पाटील, कमल पाटील, सुनील मलगुंडे, सर्जेराव देशमुख, विशाल सुर्यवंशी, प्रियांका साळुंखे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button