कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरात मंगळवारी (दि. ६) आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (दि. ७) सकाळपासून जिल्ह्यातील काही परिसरात प्रचंड तणाव होता. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पालकमंत्री बुधवारी (दि. 7) दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास कोल्हापूर विमानतळ येथे येतील. त्यानंतर सायंकाळी ४.५५ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पोहोचतील. सायं. 5 वाजता कोल्हापूर येथील परिस्थिती नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेण्यात येईल.
औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. आज (दि. ७) सकाळपासून काही परिसरात प्रचंड तणाव होता. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही भागात तोडफोड झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेतील कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार,औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तोडफोड करणार्या समाजकंटकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा