Kolhapur bandh :आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी ५ जण ताब्यात' : पोलीस अधीक्षक पंडित

पुढारी ऑनलाईन डेस्क : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज ( दि. ७) दिली. या प्रकरणी शाहूपूरी पाोलीस ठाण्या अंतर्गत तिघांना तर लक्ष्मीपूरी पाोलीस ठाण्या अंतर्गत दाेघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ( Kolhapur bandh )
औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. आजही सकाळपासून काही परिसरात प्रचंड तणाव होता. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही भागात तोडफोड झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.
कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले की, “औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तोडफोड करणार्या समाजकंटकांवरही कारवाई करण्यात आली आहे.”
हेही वाचा :
- कोल्हापूर शहरात इंटरनेट बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाचे मोबाईल कंपन्यांना आदेश
- Kolhapur Band : कोल्हापुरातील तरुणांनी भावनेच्या आहारी जावू नये : राजू शेट्टींचे आवाहन