Kolhapur Bandh : "कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात, कायदा हातात घेतला तर कारवाई" : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेमागचा बोलाविते धनी कोण आहे, हे शोधून काढू. पण कायदा हातात घेतल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होतोच. त्याचसोबत महाराष्ट्राचा जो नावलौकीक आहे त्याच्यावरही डाग लागतो. त्यामुळे कोणीही कायदा हातत घेवू नये, जर कोणी कायदा हातात घेतला तर कारवाई करावीच लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही. औरंजेबाचे उदात्तीकरण करू शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. नव्याने पैदा झालेल्यांचे बोलाविते धनी कोण आहेत हे शोधून काढू. पण कोणीही कायदा हातात घेऊ नये. जर कायदा हातात घेतला तर कारवाई करवीच लागेल. कोल्हापूरातील घटनेच्या मागे कोण हे शोधणार आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :