सांगली : चिंचणीत वडिलांच्या हातून खाली पडल्याने चिमुकलीचा मृत्यू | पुढारी

सांगली : चिंचणीत वडिलांच्या हातून खाली पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

विटा; पुढारी वृत्तसेवा : चिंचणी (मं) (ता. खानापूर) येथे वडिलांच्या हातातून निसटल्याने अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेची विटा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

चिंचणी (मं) येथे सकाळी पाच महिन्याच्या मुलीला तिचे वडील महेश दोडके हे खेळवत होते. अचानक त्यांच्या हातातून निसटून चिमुकली खाली पडली. ती बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

याबाबत सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या डॉ. पूनम राठोड यांनी विटा पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल माने करीत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button