सोलापूर : पाकणी रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरले | पुढारी

सोलापूर : पाकणी रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरले

पाकणी; पुढारी वृत्तसेवा : पाकणी रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. पाकणी येथे दौंडकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी मालगाडी मुंढेवाडी ते पाकणी दरम्यान पाकणी रेल्वे स्टेशनच्या जवळ रुळावरून सांयकाळी 4:45 वाजता घसरली.

ही मालगाडी लुपलाईनवर आसल्या कारणाने गाडीचा स्पीड कमी होता. मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरून डाऊन साईडचे चार ते पाच डबे मेन लाईनवर असल्यामुळे रेल्वे वाहतूक दोन ते आडीच तास खोळंबली हा आपघात झालेचे कळताच रेल्वेचे आर पी एफ ऑफिसर सतिश विधाते फौज फाट्यांसह दाखल झाले तर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी डि आर एम श्री निरजकुमार धोरे, ए डि एन आलोरे, पी डब्ल्यू मुळे हे ठाण मांडून होते रेल्वेचे रेस्क्यू टिमने मुंढेवाडीकडील मेन लाईनवरचे मालगाडीचे डबे रेल्वे इंजन लाऊन मुंढेवाडी स्थानकाकडे घेऊन जाऊन सांयकाळीे ७.२५ ला मेन लाईन मोकळी केली. हा अपघात बघण्यासाठी यावेळी पाकणी आणि परिसरा तील बघ्यांची गर्दी झाली होती.

Back to top button