सहकारमंत्री पाटील म्हणाले, अभिजित पाटील यांनी बंद कारखाने सुरू केले

सहकारमंत्री पाटील म्हणाले, अभिजित पाटील यांनी बंद कारखाने सुरू केले
Published on
Updated on

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : सांगोला कारखाना कुणीही चालवायला घेत नव्हता. परंतु, अभिजित पाटील यांनी तीन कारखाने यशस्वीपणे चालविल्याचा अनुभव सोबत घेऊन सांगोला कारखाना चालविण्यासाठी घेण्याचे धाडस दाखवले आहे. त्यांची धडाडी आणि सहकार क्षेत्रातील असलेला दांडगा अनुभव असल्याने कारखाना ताब्यात आल्यानंतर केवळ पंधरा ते वीस दिवसांत आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर सुरू केल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.4 (सांगोला सह.साखर कारखाना) चा गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, शेकाप नेते चंद्रकांत देशमुख, मनसे नेते दिलीप धोत्रे, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते.

सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा भागातील शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम केले. त्यांनी त्यांचे इतर तीन कारखाने ज्या चांगल्या पद्धतीने चालवले तसेच हा कारखाना चालवतील व शेतकर्‍यांना योग्य मोबदला देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकर्‍यांनी कारखाना व्यवस्थापनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, कारखान्याकडे नोंदलेल्या संपूर्ण उसाचे गाळप झाले पाहिजे. त्या दृष्टीने कारखान्याने नियोजन करावे.

यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून, शेतीला पाणी कमी पडणार नाही. तरीही शेतकर्‍यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, ठिबकद्वारे शेतीला पाणी द्यावे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास निश्चित मदत होईल. हा कारखाना चालू करण्यासाठी दिपक आबा साळुंखे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.तर आ. शहाजीबापू पाटील यांनी हा कारखाना चालू करण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले की, या कारखान्यासाठी ऊस देणार्‍या प्रत्येक शेतकर्‍यांना एफआरपी प्रमाणे दर दिला जाईल. तसेच सभासदांच्या व कामगारांच्या हितासाठी भविष्यात को-जन डिसलेरी भविष्यात उभारली जाईल असे सांगितले. कारखान्याचे यंदाच्या वर्षी 5 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट असून उत्पादीत होणारी साखर परदेशात पाठवली जाईल असेही त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला सहकारी कारखान्याचे धुराडे काल अखेर पेटले आहे.

पंढरपूरच्या अभिजीत पाटलांनी बंद अवस्थेत असलेला सांगोला कारखाना सुरु करुन पंढरपूर व सांगोला तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकर्‍यांना संजीवनी दिली आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news