

विटा (सांगली), पुढारी वृत्तसेवा : घरातील पाण्याची मोटर जोडताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला. निहाल गुडलाल नायकवडी ( १७, सध्या रा. लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली, मुळ रा. कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज ( दि. १७) सकाळी लेंगरे गावात घडली. याबाबत डॉ. एस. आर. सूर्यवंशी यांनी विटा पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील निहाल नायकवडी शनिवारी सकाळी घरी पाणी आल्यानंतर इलेक्ट्रीक मोटर जोडत होता. या वेळी त्याला विजेचा तीव्र झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला विट्यातील खासगी दवाखान्यात नेले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मृत निहाल नायकवडी यांचे वडील मुळचे कर्नाटकातील आहेत. त्याच्या पश्चात आईवडील, एक भाऊ असा परिवार आहे.
हेही वाचा :