सांगली : खानापूर तालुक्यात पहिल्या दिवशी सरपंच पदासाठी ७ अर्ज दाखल | पुढारी

सांगली : खानापूर तालुक्यात पहिल्या दिवशी सरपंच पदासाठी ७ अर्ज दाखल

विटा (सांगली), पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी थेट सरपंच पदासाठी आळसंदसह अन्य चार गावा तील इच्छुकांनी अर्ज दाखल केले. तर सदस्यपदासाठी तीन उमेदवारी अर्ज असे मिळून एकूण ७ अर्ज आज पहिल्या दिवशी दाखल झाले आहेत.

खानापूर तालुक्यातील ४५ गावातून ग्रामपंचायतीच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. मादळमुठीसह काही गावातून बिनविरोधचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. तर काही गावातून मोठी चुरस अनुभवयास मिळत आहे. अशा वातावरणात अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी आळसंद, जखिणवाडी, बामणी आणि कार्वे येथून थेट सरपंच पदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तर सदस्यपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार २ डिसेंबर पर्यंतची मुदत आहे. मात्र राखिव जागेवारील उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र काढणे, ते पडताळणीसाठी दाखल करणे. ग्रामपंचायत ना हरकत दाखला यासारख्या कागदपत्रांची पुर्तता करून ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागत आहे. त्यासाठी गावोगावी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. काही गावातून अद्यापही बिनविरोध निवडणूकीच्या बोलण्या सुरू आहेत. त्यामुळे उत्सुकता ताणली आहे. गाव पातळीवर थेट सामना रंगणार असल्याने निवडणूकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा  

राज ठाकरेंनी राज्यपालांच्या विरोधात ‘खळ्ळ खट्याक करावे : मनीषा कायंदे यांचे आव्हान

FIFA World Cup : कॅमेरूनचे झुंझार कमबॅक, सर्बियाला 3-3 गोल बरोबरीत रोखले

नागपूर : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता प्रकरणी ४१ लाखांचा दंड वसूल

Back to top button