Sambhaji Bhide : ‘कुंकू’ न लावलेल्या महिला पोलिसासमोर संभाजी भिडे एकदम नम्र… फोटो होतोय व्हायरल | पुढारी

Sambhaji Bhide : 'कुंकू' न लावलेल्या महिला पोलिसासमोर संभाजी भिडे एकदम नम्र... फोटो होतोय व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अगोदर कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो असं म्हणतं महिला पत्रकाराशी बोलणं टाळणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. टिपू सुलतानची जयंती साजरी करणे बंद करावे, या मागणीसाठी महिला पोलीस उपअधीक्षक मनीषा डुबुले यांना निवेदन सादर केले. त्यावेळी मनीषा डुबुले यांनीही कपाळाला कुंकू/टिकली लावली नव्हती. पण त्यांनी त्यांच्याशी भेट घेऊन आपली तक्रार दाखल केली होती. हा तक्रार दाखल करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या फोटोवरुन त्यांना ट्रोल केले जात आहे.

Sambhaji Bhide : काय आहे कुंकू प्रकरण 

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना मंत्रालयात साम मराठी या वाहिनीच्या पत्रकार रूपाली बडवे यांनी प्रश्न विचारला की, तुम्ही कुणाची भेट घेतली. त्यानंतर संभाजी भिडे म्हणाले की तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो. या वाक्यावरुन त्यांना ट्रोलही करण्यात आले. सर्व स्तरातून पडसाद उमटले.

कुंकू न लावलेल्या महिला पोलिसास निवेदन

संभाजी भिडे यांनी ‘टिपू सुलतानची जयंती साजरी करणे बंद करावे या आशयाचे निवेदन दि. ४ नोव्हेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांना सादर केले. त्यावेळी त्यांनी कुंकू लावले नव्हते. पण त्यांनी त्यांना निवेदन नम्रपणे दिले. त्यांनी कुंकू नसतानाही मोठ्या आदराने त्यांच्याशी भेट घेऊन आपली तक्रार दाखल केली होती. प्रत्येक हिंदू महिलेने कपाळावर टिकली/ कुंकू लावलं पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्या संभाजी भिडे यांनी आता कसे नम्रपणे निवेदन दिले अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यांच्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संभाजी भिडेंबद्दल हे माहित आहे का?

संभाजी भिडे म्हणजेच नाव मनोहर भिडे हे सांगलीचे. त्यांचे वय सध्या ८० आहे. त्यांची भिडे गुरूजी म्हणूनही ओळख आहे. त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना केली. तत्पूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. त्यांचे काका बाबाराव भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख कार्यकर्ते  हे त्यांचे काका होते. संभाजी भिडे हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात.

Sambhaji Bhide : भिडेंचा  दुटप्पीपणा – नाना पटोले

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक ट्विट करत संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, टिकली न लावलेल्या महिला पत्रकाराशी बोलणारे भिडे, टिकली न लावलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांना मात्र नम्रतेने निवेदन देतात. दुटप्पीपणा आणखी कशाला म्हणतात?

हेही वाचा

Back to top button