Rajasthan Congress Crisis : काँग्रेस अध्‍यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, मुख्‍यमंत्रीपदी राहणार का हे माहिती नाही : अशोक गेहलोत | पुढारी

Rajasthan Congress Crisis : काँग्रेस अध्‍यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, मुख्‍यमंत्रीपदी राहणार का हे माहिती नाही : अशोक गेहलोत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस अध्‍यक्षपदाची निवडणूक मी लढविणार नाही. मागील काही दिवसांमध्‍ये राजस्‍थानमध्‍ये ज्‍या राजकीय घडामोडी झाल्‍या, त्‍याबाबत मी सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे. आता मी यापुढे राजस्‍थानचा मुख्‍यमंत्री राहणार की नाही याची माहिती नाही, असे सूचक विधान अशोक गेहलोत यांनी आज माध्‍यमांशी बोलताना केले.

मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेस अध्‍यक्षपदाच्‍या शर्यतीत आल्‍यानंतर राजस्‍थानमधील राजकीय घडामोडी कमालीच्‍या वेगावल्‍या होत्‍या. पक्षाध्‍यक्षपदाबरोबर मुख्‍यमंत्रीपदही आपल्‍याकडेच राहावे यासाठी गेहलोत आग्रही होते. त्‍यामुळेच सोनिया गांधी यांच्‍याबरोबर बुधवारी होणारी भेट टाळली, असे मानले जात होते. बुधवारी रात्री उशीरा गेहलोत दिल्‍लीत दाखल झाले. आज दुपारी त्‍यांनी काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

Rajasthan Congress Crisis : सोनिया गांधी यांची माफी मागितली

या भेटीनंतर माध्‍यमांशी बोलताना गेहलोत म्‍हणाले, “मागील काही दिवसांमध्‍ये राजस्‍थानमध्‍ये ज्‍या राजकीय घडामोडी झाल्‍या त्‍याबाबत मी सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे. मागील ५० वर्षांहून अधिक काळ मी काँग्रेस पक्षासाठी एकनिष्‍ठपणे काम करत आलो आहे. पक्षाने नेहमीच माझ्‍यावर मोठी जबाबदारी दिली आहे. राजस्‍थान प्रदेशाध्‍यक्षपद किंवा तसेच तीन वेळा मुख्‍यमंत्रीपदाची जबाबदारी पक्षाने माझ्‍यावर सोपवली आहे. काँग्रेस अध्‍यक्षपदाची निवडणूक मी लढविणार नाही. मागील काही दिवसांमध्‍ये राजस्‍थानमध्‍ये ज्‍या राजकीय घडामोडी झाल्‍या त्‍याबाबत मी सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे. आता मी यापुढे राजस्‍थानचा मुख्‍यमंत्री राहणार की नाही याची माहिती नाही.”

हेही वाचा : 

 

 

Back to top button