

पुढारी ऑनलाईन डेस्क : T-20 विश्वचषका आधी भारताला मोठा फटका बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. (Jasprit Bumrah)
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे की, त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही, मात्र तो चार ते सहा महिने क्रिकेटपासून लांब रहावे लागेल. बुमराह संघासह तिरुअनंतपुरमलाही गेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही तो बाहेर झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिला सामना बुमराह खेळू शकला नव्हता. त्याच्याऐवजी दीपक चहरला संधी देणय्ता आली होती. आशिया चषक स्पर्धेला मुकलेल्या बुमराह याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत पुनरागमन केले होते. मात्र या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. यावरुनही वाद झाला होता. प्लेइंग-11 मध्ये समावेश असताना बुमराह याला विश्रांती कशी दिली, असा सवालही केला जात होता.
आता टी-२० विश्वचषक स्पर्धेमधून बुमराह बाहेर पडल्याने त्याची जागा कोण घेणार ? हा मोठा प्रश्न आहे. सध्या तरी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी किंवा दीपक चहर या दोघांची नावे आघाडीवर आहेत. मोहम्मद शमी याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिेकेविरुद्च्या टी-२० मालिकांना मुकला. मात्र टीम इंडियासाठी एक सकारात्मक बातमी म्हणजे, शमी हा कोरोनामुक़्त झाला आहे. त्यामुळे चहरबरोबरग आता बुमराहच्या जागी त्याचाही विचार होईल, असे मानले जात आहे.