जत (जि. सांगली) : शेतकरी हतबल; महामार्गावर ओतला दीड टन टोमॅटो

जत (जि. सांगली) : टोमॅटोला दर न मिळाल्याने जत येथील महामार्गावर टोमॅटो ओतून देताना भाजीपाला उत्पादक शेतकरी काडाप्पा बिराजदार.
जत (जि. सांगली) : टोमॅटोला दर न मिळाल्याने जत येथील महामार्गावर टोमॅटो ओतून देताना भाजीपाला उत्पादक शेतकरी काडाप्पा बिराजदार.
Published on
Updated on

जत (जि. सांगली); पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्याभरात भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जत येथील राजे विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये सलग १५ दिवस टोमॅटोच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. यामुळे सोमवारी सकाळी वळसंग (ता. जत) येथील काडाप्पा धोंडाप्पा बिराजदार या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने भाजीपाला मार्केट समोरील महामार्गावर दीड टन इतका टोमॅटो ओतून निषेध व्यक्त केला आहे.

उत्पादित शेतीमालाला दर नाही. टोमॅटोला प्रति किलो दोन ते तीन रुपये इतका अत्यल्प दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी भाजीपालासाठी लागवड, निगा, व्यवस्थापनासाठी घातलेला खर्च देखील निघत नाही ही वस्तुस्थिती आहे.

बिराजदार या शेतकऱ्याने वळसंग येथे एक एकरात टोमॅटोची लागवड केली आहे. या लागवडीपासून टोमॅटो मार्केट आणेपर्यंत एक लाख रुपये खर्च झाला आहे. परंतु गेल्या आठवड्याभर झाले. मार्केटमध्ये उत्पादित भाजीपाला आणूनही वाहतूक व तोडणीचा खर्च निघत नाही. यामुळे हतबल झालेल्या बिराजदार या शेतकऱ्याने सोमवारी ट्रॅक्टरमधून भरून आणलेला टोमॅटो रस्त्यावर ओतला. यामुळे महामार्गावर लाल चिखल तयार झाला होता.

सोमवारी सकाळी बिराजदार या तरुण शेतकऱ्याने भाजीपाला मार्केटमध्ये ट्रॅक्टरमध्ये दीड टन इतका टोमॅटो आणला होता; परंतु टोमॅटोची १२ ते १५ टन इतकी मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. परिणामी ५० रुपये किलो याप्रमाणे कॅरेटला दर होता. तरीदेखील पन्नास रुपये प्रमाणे कॅरेट उतरून घेण्यास व्यापारी धजावत नव्हते; यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने महामार्गावर टोमॅटो आणून ओतला.

भाजीपाल्याच्या दरात प्रचंड घसरण

सद्यस्थितीत मार्केटमध्ये दोडका, टोमॅटो, ढबू मिरची, वांगी या भाजीपाल्यालाचे दर पडले आहेत. जत येथे भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. हा भाजीपाला मंगळवेढा सांगोला जत येथून येत आहे. या भाजीपाल्यास सांगली, कर्नाटक, विजापूर, जमखंडी, सांगोला येथून मागणी आहे.

एकीकडे महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्याप्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव नाही. पीक संगोपनासाठी केलेला खर्च निघत नाही. मी एक एकर टोमॅटो लागवड केली. याकरिता एक लाख रुपये इतका खर्च केला. परंतु गेले आठवडाभर टोमॅटो तोडणी करून भाजीपाला मार्केटमध्ये आणून विक्री करत असताना दरांमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. टोमॅटोला प्रति किलो दोन रुपये इतका कमी दर आल्याने टोमॅटो रस्त्यावर टाकून द्यावा लागला आहे.
– काडाप्पा धोंडाप्पा बिराजदार, टोमॅटो उत्पादक शेतकरी, वळसंग

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जत (जि. सांगली) : टोमॅटोला दर न मिळाल्याने जत येथील महामार्गावर टोमॅटो ओतून देताना भाजीपाला उत्पादक शेतकरी काडाप्पा बिराजदार.

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news