विधान परिषद निवडणूक : कोणाला मतदान करणार?, मनसे आमदार राजू पाटील म्हणाले… | पुढारी

विधान परिषद निवडणूक : कोणाला मतदान करणार?, मनसे आमदार राजू पाटील म्हणाले...

नेवाळी (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवारी दि. 20 जून रोजी मतदान होत असून राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची या निवडणुकीत कसोटी लागली आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

दहावी जागा काँग्रेसचे भाई जगताप की भाजपचे प्रसाद लाड जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का बसणार का, याबाबतही उत्सुकता आहे. दरम्‍यान, राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार खूप चर्चेत आले होते. त्यांचे मत भाजपमध्ये गेल्याची चर्चाही  होती. यावेळी कोणाला मतदान करणार आहे. असा संभ्रम आहे.

राजू पाटील माध्यमांशी बोलताना म्‍हणाले की, विधान परिषदेच्या मतदानाबाबत सस्पेन्स आहे. कोणी गृहीत धरू नये. दरम्यान ते थोड्या वेळापूर्वी विधान परिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आणि ते आपल्‍या  मतदानाचा हक्‍क बजावतील.

हेही वाचा  

Back to top button